कोल्हापूर (प्रतिनिधी)  : राज्यातील माता- भगिनींचा अपमान करणारे विधान केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा  कोल्हापुरात आल्यास  त्यांना कडक लक्ष्मीचे फटके  देऊन महिला जाब विचारतील, असा इशारा  आज (शनिवार) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी महिला आघाडीने दिला.

लाली लावलेल्या गालाचा मुका घेणार पक्ष म्हणजे राष्ट्रवादी, असे वादग्रस्त विधान दरेकर यांनी केले होते. याबद्दल त्यांच्या प्रतिमेस कडकलक्ष्मीचे फटके   देऊन  महिला आघाडीने राजारामपुरीतील माऊली चौकात निदर्शने करत निषेध केला.

यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिता कांबरे, शहर विभाग श्वेता बडोदेकर, राणी चव्हाण,  महादेवी यादव, रुपाली धोत्रे, कल्पना रंजगणेकर, फातिमा लाखे, जयश्री गवळी, पूजा चव्हाण,  नूतन सोनटक्के, हेमलता पोळ, लता मोरे, निरंजन  कदम, राजू शिंदे, पोपट रणदिवे, अजय बाटूगे, सुरेंद्र माने, दिलावर पठाण, शंकर भांबुरे, आकाश पाथ, बैजू पाथरूठ, अशोक धोत्रे, महेश कांजर आदी उपस्थित  होते.