…अन्यथा इचलकरंजी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करू : राजेश बांगड

0
22

शिरोळ (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील दत्तगोविंद डेव्हलपर्सच्या दत्त अपार्टमेंटच्या भागीदार यांनी खोटी कागदपत्रे सादर करून शासकीय नियमांचे उल्लंघन करून नगरपरिषदेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतले आहे. तरी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ३० मार्चला नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा राजेश बांगड यांनी दिला आहे.

याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दत्तगोविंद डेव्हलपर्सच्या दत्त अपार्टमेंटच्या भागीदार कृष्णा डाके, विवेक हावले, दिग्विजय नाईक, माधुरी नाईक, वृषाली नाईक, आदित्य सुर्यवंशी, उल्हास सुर्यवंशी यांनी खोटी कागदपत्रे सादर करून नगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतले आहे. या कामी  त्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे. तरी इमारतीचे भोगवटदार  प्रमाणपत्र रद्द करून संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात यावा. तसेच याकामी मदत करणाऱ्या नगरपरिषदेच्या अभियंता, नगररचनाकार यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. याप्रकरणी २९ मार्चपर्यत नगरपरिषदेने कारवाई न केल्यास ३० मार्चरोजी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा राजेश बांगड यांनी या निवेदनात दिला आहे.