..अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करू : अमोल देशपांडे

0
73

हुपरी (प्रतिनिधी) : हुपरी नगरपरिषद हद्दीमधील भागाभागात डेंग्यू, चिकनगुनिया साथीने थैमान घातले आहे. अनेक नागरिकांना याचा ञास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने त्वरित भागातील स्वच्छता करून डास प्रतिबंधक औषधांची फवारणी सुरू करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख अमोल देशपांडे, विभाग प्रमुख विनायक विभूते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी हुपरी पोलीस ठाण्याचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

निवेदन देताना महिला आघाडी ता. संघटिका उषा चौगुले, शहर प्रमुख अमोल देशपांडे, शहर संघटिका मीना जाधव, युवासेनेचे भरत देसाई, उपशहरप्रमुख भरत मेथे, सागर खोत, संजय चौगुले आदी उपस्थित होते.