कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील शौचालय घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश २१ डिसेंबरपर्यंत काढण्यात यावेत. अन्यथा राजर्षी छत्रपती शाहू स्मारक येथून जिल्हा परिषदेपर्यंत चालत जाऊन पदाधिकाऱ्यांना वेस्टर्न संडासचे भांडे भेट देण्याचा इशारा हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील यांनी आज (बुधवार) येथे दिला. 

 

स्वच्छ भारत अभियानातंर्गत सन २०१९-२० मध्ये शौचालय योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी प्रविण पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये अर्धनग्न आंदोलन केले होते. याची दखल घेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश २१ डिसेंबरपर्यंत दिले जातील, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, २१ डिसेंबरपर्यंत शौचालय घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश न काढल्यास पदाधिकाऱ्यांना वेस्टर्न संडासचे भांडे भेट दिले जाईल, असा  इशारा प्रविण पाटील यांनी दिला आहे.