आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

0
32

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स संस्थेच्या ५० व्या वर्धापन साजरा होतोय. या दिनानिमित्त २३ ऑगस्ट रोजी ताराबाई पार्क येथील रेसिडेन्सी क्लब येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती असोसिएशनचे प्रेसिडेंट अजय कोराणे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.

अजय कोराणे म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्यक्रम घेता आला नाही. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील असणार आहेत. तर जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून इतर सभासद आँनलाईन सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसला असून या अनुषंगाने समस्यांचे निराकरण होण्यासाठी  महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच ग्रामविकास आणि नगरविकास या दृष्टीने कांही तांत्रिक मुद्दे चर्चेत घेतले जाणार आहेत. त्यामुळे तांत्रिक सभासदांची संघटना या नात्याने तीनही मंत्र्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.तसेच पुढील वर्षाच्या कामाचा अजेंठा विषद करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला विजय चोपदार, राज डोंगळे, उमेश कुंभार, पदाधिकारी उपस्थित होते.