कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (गुरुवार) त्यांच्या उपस्थितीत कोथरूड, पुणे येथे तर ११ रोजी कोल्हापुरात विविध उपक्रम होणार आहेत.

दिनांक ११ जून रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर येथे असून वाढदिवस समितीच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून शुभेच्छा स्विकारणार आहेत. यावर्षीच्या वाढदिवसाचा संकल्प कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लँटची निर्मिती करणे व इतर वेळेस कन्व्हर्टरमधून ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून अन्यत्रही उपयोगात आणणे असा आहे.

कोल्हापूर येथे वाढदिवस समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक ११ रोजी सकाळी १० : ३० वाजता नंगीवली तालीम (पाण्याचा खजिना) यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस लाकूड प्रदान कार्यक्रम, सकाळी ११ वाजता भाजपा प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून हॉकी स्टेडियम समोर को.म.न.पा संचलित भाजपा / ताराराणी आघाडी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन, यानंतर दुपारी १२ वाजता व्ही.टी.पाटील संकुल, ताराराणी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन होणार आहे. दिनांक १२ रोजी सकाळी १० : ३० शेंडापार्क येथील वृक्षांसाठी खत घालणे, त्या परिसरातील साफ-सफाई होणार आहे. आ. चंद्रकांतदादा सकाळी ११ : १५ वाजता हॉकी स्टेडियम येथे अॅस्ट्रोटर्फ मैदानाला भेट देऊन दुपारी १२ वाजता भाजपा राजारामपुरी मंडलामध्ये सरचिटणीस विजय जाधव यांचे कार्यालयात आयोजित सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छिणाऱ्या हितचिंतकांनी ऑक्सिजन प्लँट उभारणीसाठी मदतरुपी शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन वाढदिवस समितीच्यावतीने आले आहे.