कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातल्या अनेक अनामिक तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘मी हाय की’ मिशन अंतर्गत ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेत रक्तदान शिबिर आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या माध्यमातून १८ ते ३० या वयोगटातील नवीन रक्तदात्यांनी फळी निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवून एक सामाजिक चळवळ निर्माण करायचा उद्देश आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमास सुरुवात होणार असून जागतिक दर्जाचे सॅनिटेशन, निर्जंतुकीकरण इक्विपमेंट, मिस्ट मशीन, चार तज्ज्ञ डॉक्टर तिथे उपलब्ध असणार आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेऊनच हा कॅम्प राबवला जाणार आहे.