राशिवडे येथे महिलांच्या आरोग्यासाठी व्याख्यानाचे आयोजन…

0
246

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे येथील शिवबा प्रतिष्ठानतर्फे महिला दिन पंधरवड्यानिमीत्त महिला आणि आरोग्य या विषयावर गोसावी समाजातील महिलांसाठी डॉ. चैताली आणि डॉ. रुक्मिणी गुरव यांच्या  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य भिमराव गोसावी होते.

यावेळी दैनंदिन कामकाजाच्या रहाटगाडग्यात शरीराकडे लक्ष देऊन आरोग्य सांभाळावे. मुलींचे लग्न योग्य वयातच करावे आणि मुलांच्या बाबतीत योग्यरीतीने कुटुंब नियोजन अवलंबावे. याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रेखा लाड, विद्या पोवार, शिला घोटने, बाळताई लाड यांचा सत्कार करण्यात आला.