कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर गरबा-दांडिया खेळल्याप्रकरणी शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाच्या विश्वद्वीप संजय (रा. नागाळा पार्क), सिद्धेश मंगेश पाटील, सुजित वाईगडे, राकेश साळुंखे, दिग्विजय कोंडरे, अमोल चव्हाण यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी आहे. मात्र शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाने  शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून गरबा दांडीयाचे आयोजन केले होते.  त्यामुळे मंडळाच्या १०० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.