वाघुर्डे येथे यात्रेनिमित्त बैलगाड्यांचे आयोजन

0
58

कळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे, ता.पन्हाळा येथे नरहरि यात्रेनिमित्त बैलगाडे काढण्यात आले होते. याचे उद्घाटन पोलीस पाटील अनिल पाटील, मा.सरपंच बाजीराव पाटील, मा.सदस्य आनंदा जाधव यांचे उपस्थितीत उपसरपंच आनंदा जाधव यांचे हस्ते करण्यात आले. या गावामध्ये तीन वर्षातून एकदा यात्रा भरते. नरहरि देवाची सकाळी धार्मिक विधि कार्यक्रम, सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. भाविकांनी दिवसभर दर्शनाचा लाभ घेतला. 

बैलगाड्यांना रंगीबेरंगी फुले, फुगे, घुंघुरांनी सजविण्यात आले होते. सायंकाळी पारंपारीक वाद्यांच्या गजरात बैलगाडयांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. प्रथम बैलगाडयाचा मान मिळविण्यासाठी चिठ्ठी उधळण्यात आली होती. त्यानुसार जोतिराम शिखरे प्रथम बैलगाडाचे मानकरी ठरले. त्यानंतर महादेव पाटील, सर्जेराव पाटील, पांडूरंग टिक्के, चंद्रकांत पाटील, विष्णू नाईक, रामा रावण, विष्णू पाटील (नवलेवाडी) यांच्या बैल जोड्या होत्या. याचे आयोजन रंगराव शिखरे यानी केले. बैलगाडे पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पै-पाहुणे, मित्रमंडळी यांनी गर्दी केली होती.