कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कोजिमाशि’ संस्थेमध्ये १८ वर्षे स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीचे प्रमुख शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी सभासद हिताचा कारभार केल्यामुळे डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंचासह राधानगरी तालुका क्रीडा शिक्षक संघटना, राधानगरी शिक्षकेतर संघटना, राधानगरी तालुका शिक्षणसंस्था चालक संघटना या संघटांनी पाठिंबा जाहीर केला.

कोजिमाशि पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी तालुक्याचा मेळावा गुडाळ येथे झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष जी. बी. खांडेकर होते. या निवडणुकीतून माघार घेतलेले एन. के. पाटील, शशिकांत बैलकर, एन. जी. नलवडे, अरुण पाटील जे. बी. जाधव आदींचा शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंच, राधानगरी तालुका शिक्षण संस्था चालक संघटना अध्यक्ष डॉ. व्ही. बी. सरावणे, राधानगरी तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे एन. के. पाटील, बी. एस. जठार, टी. एल. किल्लेदार, मारुती पाटील, एम. बी. पाटील, राधानगरी तालुका शिक्षकेतर संघटनेचे एम. एन. पाटील, संजय कांबळे, आण्णापा चौगले, सचिन पाटील, जयदीप चव्हाण आदी प्रमुखांसह अन्य सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

चेअरमन बाळ डेळेकर, बी. जी. बोराडे, राजेंद्र रानमाळे, सुभाष खामकर,  आर. वाय. पाटील, रंगराव तोरस्कर, डॉ. ए. एम. पाटील, बी. बी. पाटील, आर. आय. पाटील, पी. डी. शिंदे, रघुनाथ नांगरे, पृथ्वीराज पाटील, के. डी. पाटील, सुनील कल्याणी, राजू भोरे, गंगाराम पाटील, सचिन रामसिंग आणि सभासद उपस्थित होते. विजय कांबळे यांनी आभार मानले.