राधानगरी तालुक्यात ४९ ठिकाणी महिलांना संधी…

0
137

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यात ९८ ग्रामपंचायतींचा आरक्षणाची सोडत जाहीर झाली. त्यापैकी ४९ ठिकाणी महिलांना संधी मिळालेली आहे. तर ३० ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण खुले पद आहे. याबरोबरच अनुसूचित जातीसाठी ६ ग्रामपंचायतींना संधी मिळाली आहे.

तर नागरिकाचा मागास प्रवर्गातील १३ ठिकाणी सोडत झाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठी गावे असणाऱ्या राशिवडे बुद्रुक आणि कसबा वाळवे या ठिकाणी सर्वसाधारण स्त्री आरक्षण पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी फारशी चुरस दिसणार नाही परंतु सत्ता मिळवण्यासाठी मातब्बर रिंगणात असते हे मात्र नक्की.