पन्हाळा गडावरील वास्तू खुल्या करा : आ. गोपीचंद पडळकरांना निवेदन   

0
166

पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक वारसा लाभलेले पन्हाळा हे थंड हवेची ठिकाण आहे. पन्हाळा गड पाहण्यासाठी लाखो पर्यटक भेट देत असतात. पण गडावरील तीन ऐतिहासिक इमारती अद्यापही बंद अवस्थेमध्ये आहेत. ही स्थळे लवकरात लवकर सुरू करावीत, अशा मागणीचे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांना आज (मंगळवार) येथे देण्यात आले.

पन्हाळा गडावर पडळकर आले असता त्यांनी पर्यटन वाढीसाठी चर्चा केली. यावेळी नगरसेविका माधवी अमरसिंह भोसले, संग्रामसिंह भोसले, पृथ्वीराज भोसले, अनुप गवंडी, देवदास वरेकर, सदाम मुजावर, कासम नगारजी, अनंत पवार, अक्षय वाईंगडे, शुभम आडके आदी उपस्थित होते.