कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे येथे बेकायदा मद्याचा साठा जवळ बाळगल्याबद्दल काल (शुक्रवार) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. सुभाष राजाराम पाटील (वय ४४) असे त्याचे नाव आहे. हेड कॉन्स्टेबल बळवंत पाटील यांनी याची फिर्याद दिली आहे.

सुभाष पाटील याने आपल्या राहत्या घराच्या पाठीमागच्या बाजूला उघड्यावर बिगरपरवाना, बेकायदा मद्याचा साठा करून ठेवला होता. काल रात्री घराच्या पाठीमागील बाजूस तो उघडयावर मद्याची विक्री करीत होता. त्याच्याकडे १,५६० रुपये किंमतीच्या देशी दारुच्या  बॉक्समध्ये एकूण ३० बाटल्या आढळून आल्या.