दोन डोस घेणाऱ्यांनाच ‘केएमटी’मधून प्रवास करण्याची परवानगी  

0
34

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिका हद्दीत ४ ॲक्टीव रुग्ण आहेत. ओमिक्रोन व्हेरियंटच्या अनुषंगाने शासनाच्या नविन मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर अंमल केला जाईल, असे सांगून केएमटीमधून प्रवास करताना दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच परवानगी असेल, असे सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे यांनी सांगितले.    

शहरातील विकासकामांबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत माजी पदाधिकाऱ्यांची बैठक महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, आदिल फरास, सचिन पाटील, माजी नगरसेवक प्रा. अशोक जाधव, सुनील पाटील, प्रकाश गवंडी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, दुसरा डोस न घेतलेले ५२ हजार नागरिक आहेत. त्यांची ८४ दिवस मुदत पुर्ण झालेली आहे. परंतू ते दुसरा डोस घेण्यासाठी आलेले नाहीत. अशा नागरीकांची प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रानुसार माजी सदस्यांना लिस्ट देऊ. जेणेकरुन हे लसीकरण पूर्ण करता येईल. शहरातील हॉकर्स, भाजीपाला विक्रेते, आस्थापना, दुकानदार यांचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक आहे. डोस पूर्ण नसल्यास संबंधितांवर शासन निर्णयानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. समारंभासाठी हॉलच्या क्षमतेच्या २५ टक्केच लोकांना परवानगी राहील. या २५ टक्के लोकांची लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.