शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशनतर्फे बुधवारपासून ऑनलाईन ध्यानधारणा महाशिबिर

0
178

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाचे पूर्ण वर्ष कोरोना संसर्गाच्या विरुध्द लढण्यासाठी जात आहे. संपूर्ण जग त्याचा प्रतिकार करत असताना अशावेळी स्वत: ला शांत ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे नियमित ध्यान. हिमालयातील ८०० वर्षे जुना पौराणिक ध्यान संस्कार ग्रहण करण्याची नि:शुल्क ऑनलाईन संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी २३ ते ३० डिसेंबररोजी सकाळी ६ ते ८ व  पुनःप्रक्षेपण संध्याकाळी ६ ते ८ असे ऑनलाईन आठ दिवसाचे महाशिबिर आयोजित केल्याची  माहिती शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशनचे अंबरीश मोडक यांनी दिली. 

प्रत्येक मनुष्य कुठल्याही किचकट पध्दती अथवा साधनेशिवाय ध्यान करु शकतो. साधनेद्वारा प्राप्त केलेले हे आध्यात्मिक गूढ ज्ञान सोप्या भाषेत अवघ्या आठ दिवसात सांगितले जाणार आहे. यादरम्यान दररोज स्वामींजी बरोबर लाखो लोकांच्या समूहाने ध्यान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ‘गुरुतत्व’ हा शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशनद्वारा संचलित एक वैश्विक मंच आहे. ‘गुरुतत्व’ नावाचे फेसबुक, यूट्युब चॅनल, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सर्व माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांनी माहिती पाहून सहभागी व्हावी, असे आवाहन करण्यात आले आहे.