नोकरीसाठी ऑनलाईन जॉब फेअर

0
75

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत केले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त सं. कृ. माळी यांनी दिली.

ते म्हणाले, मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच आहे. जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. युझर आयडी व पासवर्डच्या आधारे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.  इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस कळवण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.    

इच्छुक युवक युवतींनी २४ नोव्हेंबर पर्यंत पसंतीक्रम नोंदवून संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ०२३१ – २५४५६७७ वर संपर्क साधावा.