चंदगड तालुक्यात ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा खेळखंडोबा

0
147

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २३ डिसेंबर पासून अर्ज दाखल केले जात आहेत. पण मध्येच तीन दिवस सुट्ट्या असलेमुळे यंत्रणा खंडित झाली होती. आज खंडित यंत्रणा पुन्हा सुरू झाली आहे. पण आज सोमवार असलेमुळे ग्रामीण भागात लाईट व्यवस्था नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ठप्प झाल्याने प्रकिया ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात असंतोष पसरला आहे.

चंदगड तालुक्याला याचा खूप मोठा परिणाम भोगावे लागत आहे. मुळातच येथे इंटरनेट सेवा व्यवस्थित नाही त्यातच लाईट नाही. त्यामुळे ऑनलाइन यंत्रणेचा खेळखंडोबा झाला आहे. याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना फ़ोन केला असता सतत मीटिंगमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येते. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

मागील तीन दिवस सुट्टी होती.आज उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. पण लाईट नसलेमुळे सर्व यंत्रणा खंडित झाली आहे.