रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्राच्या वतीने आज (गुरूवार) कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. एक पाऊल कोरोना मुक्तीकडे हा उद्देश साध्य करण्यासाठी ४ हजार कोविड लस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचे हस्ते करण्यात आले. तर यावेळी एकूण १५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

लसीकरणासाठी ५ वार्डातील नागरिकांसाठी ४ वेगवेगळ्या ठिकाणी लस देण्याची सोय केली होती. एकूण १६ डाटा ऑपरेटर, आशासेविका, मदतनीस, शिक्षक यांची टिम केली होती. यामुळे मोठ्या संख्येने लसीकरण करण्यात मदत झाली.

यावेळी सरपंच नारायण भोसले, उपसरपंच तानाजी सादळे, सदस्य आण्णासो गुंडे,  ग्रामसेवक कुमार वंजीरे, तलाठी सत्तार गवंडी, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसुंधरा देशमुख, डॉ. अश्विनी नवघरे, डॉ. सपना माने, आरोग्य सहाय्यक परवीन नदाफ, श्रीमती डी. आर. मोराळे, रांगोळी उपकेंद्र आरोग्य सेविका सुमन पाखरे, अनुराधा आमले, आरोग्य सेवक रिंकल सातपुते, डॉ. पंकज जंगले आदी उपस्थित होते.