श्रीराम संस्थेवर सत्ताधारी गटाचा एकहाती विजय…

0
409

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील श्रीराम सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सत्ताधारी गटाने एकहाती विजय मिळवला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी ५ हजार ९३४ सभादांपैकी, ४ हजार ४२८ इतक्या सभासदांनी मतदानाचा अधिकार बजावला. निवडणूक अधिकारी अमर शिंदे आणि उदय उलपे यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता ४० टेबलांवर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली.

यामध्ये सर्वाधारण गटात – उमाजी उलपे ३०७८, युवराज उलपे २९८६, धनाजी गोडसे ३०३०, राजीव चव्हाण २८१०, हिंदूराव डोंबरे ३०५१, आनंत पाटील २९५०, मारुती पाटील ३०९८, मिलिंद पाटील ३०५३, संतोष पाटील ३०१७, तानाजी बिरंजे २९६४, रमेश रणदिवे ३०१६, विलास वाडकर २८६१ हे सर्व विजयी झाले आहेत.

तर विरोधी गटाचे उमा उलपे, बाळासो उलपे, सचिन उलपे, विजय चव्हाण, बाजीराव चौगले, राजाराम परीट, प्रशांत पाटील, रघुनाथ पाटील, रुपेश पाटील, राजेंद्र पोवार, सत्यजित रणदिवे, सतीश वेटाळे हे उमेदवार पराभूत झाले आहेत.