शिरढोण येथे नदीत उडी मारून इचलकरंजीतील एकाची आत्महत्या

0
536

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरढोण (ता.शिरोळ) येथील पुलावरुन पंचगंगा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केलेल्या अशोक दत्तोबा मांगलेकर (वय ५० रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यांचा मृतदेह वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांच्या पथकाने आज बाहेर काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक मांगलेकर यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिरढोण येथील पुलावरुन पंचगंगा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली होती. शनिवारी ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वजीर रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकातील जवानांनी नदीपात्रातील मृतदेह अवघ्या काही वेळातच शोधून बाहेर काढला. यावेळी कुरुंदवाड पोलिसांनी पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे.