शेळोली येथे गव्याच्या हल्ल्यात एक जखमी

0
613

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील शेळोली येथे शेतातील म्हशीच्या गोठ्याजवळ गव्याच्या हल्ल्यात शिवाजी शंकर सावंत (वय वर्षे ४५) हा शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी घडली.

जखमी सावंत गावाबाहेर असलेल्या म्हैशीच्या गोठ्याजवळ गेले असता तेथे त्यांच्यावर  गव्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. त्यांना सुनील देसाई यांनी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद कदम यांनी उपचार केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले. यावेळी युवा नेते राहूल देसाई, प्रकाश वासकर, वन अधिकारी यांनी सहकार्य  केले.