झुलपेवाडी येथील एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

0
48

गारगोटी (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील विश्वास दत्तू पावले (वय ५४) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. जानबा सुभाना धुमाळ (रा. झुलपेवाडी) यांनी आपल्या शेताच्या भोवतीने तारेचे कुंपण करून त्याला विजेचा पुरवठा केला होता. यावेळी विश्वास पावले यांच्या हाताचा स्पर्श या तारेला झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद शिवाजी दत्तू पावले यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलिसांनी जानबा धुमाळ यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.