इचलकरंजीत यंत्रमाग कारखानदाराच्या मारहाणीत एकाचा मृत्यू…

0
142

इचलकरंजी (प्रतिनिधी) : चोरीच्या संशयावरुन झालेल्या बेदम मारहाणीत इचलकरंजी शहरातील एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. अलीम गजवाल असे त्याचे नाव असून हा प्रकार खोतवाडी परिसरात सांगली रोडवरील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी खोतवाडीतील यंत्रमाग कारखानदार अल्ताफ शेख याला ताब्यात घेतले आहे.

मागील आठवड्यात खोतवाडी येथील अल्ताफ शेख या यंत्रमाग कारखानदाराची सायकल चोरीस गेली होती. अलीम गजवाल याने सायकल चोरुन ती विकल्याची माहिती शेख याला समजली. त्यामुळे शेख याने १५ मार्च रोजी रात्री मद्यपान केलेल्या गजवाल याच्याकडे याबाबत विचारपूस केली. या वेळी गजवाल हा उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागल्याने शेख याने चिडून त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गजवाल याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि तपासाबाबत शहापूर पोलिसांना सूचना केल्या. शेख याने पलायन केले होते, मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले असून याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.