आदमापूर येथे टँकरच्या चाकाखाली सापङून एकाचा मृत्यू…

0
432

गारगोटी (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामाच्या दर्शनासाठी जात आसताना टँकरच्या चाकाखाली सापङून एकाचा मृत्यू झाला आहे. पांङूरंग गणपती ङेकळे (वय ५७, रा. मजरे कासारवाङा, ता. राधानगरी, सध्या रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद भूदरगड पोलिसांमध्ये झाली आहे.

पांडूरंग डेकळे हे आपल्या मोटर सायकल क्र. एमएच ०९ डीक्यू  ५९६ वरून कोल्हापूरहून आदमापूर येथील श्री संत बाळूमामाच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी मूदाळतिट्टा-मूरगूड रोडवर एचपी पेट्रोल पंपासमोर केमिकल घेवून निपाणीला एचआर ३८ डब्ल्यू ९२३६ हा टँकर जात होता. यावेळी डेकळे हे टँकरच्या पुढच्या चाकाखाली सापडले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी गारगोटी येथील ग्रामीण रूग्णालयात घेवून जात आसताना त्यांचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला.

याप्रकरणी टँकरचालक सूरेंद्रसिंह रामजी ठाकूर (वय २४, रा. टाऊन्स सेमरझाल ता. नरवाल जि. कानपूर, उत्तरप्रदेश) याच्यावर भूदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.