कळे येथे बालग्राम संरक्षण समितीचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न…

0
18

कळे (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील बालभिक्षेकरी, बालकामगार आणि पालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर कळे येथे आयोजित करण्यात आले होते.  यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या शिबीरात पालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करणे, पालकांच्या सर्व प्रकारच्या शोषणापासून अत्याचारापासून मुक्ती व संरक्षण करणे, वेळीच बालविवाह रोखणे आणि पीडित बालकाला वेळेत मदत उपलब्ध होण्यासाठी ग्राम बालसंरक्षण समितीमधील सर्वांनी त्यांच्या कार्य व जबाबदाऱ्यांची माहिती व्हावी. तसेच पन्हाळा तालुक्यातील महसुली गावातील ग्राम बाल संरक्षण समितीमधील अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आणि अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकरिता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पन्हाळ्याचे संरक्षण अधिकारी नवीन गुरव, शाहुवाडीचे योगेश नलवडे, सागर दाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास कार्यालयातील समुपदेशक, कर्मचारी उपस्थित होते.