मडीलगे येथे एकाची विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या…

0
570

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील मडीलगे येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे शिवाजी कुराडे (वय ६४) यांनी मडीलगे गावाजवळील घुमट नावाच्या जुन्या विहिरीत राहटाला दोरी बांधून गळफास घेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची फिर्याद त्यांचे जावई शरद बुडके यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कुराडे हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निगवॉकला जातात. बराच वेळ ते घरी न आल्यामुळे त्यांच्या जावयांनी शोधाशोध केली. यावेळी गावशेजारील असणाऱ्या विहिरीत दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आजरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.