राजेंद्रनगर येथे जागेच्या वादातून एकाला मारहाण…

0
113

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राजेंद्रनगर येथील दुसऱ्याच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करुन एकाला डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केले. अरुण नारायण जगदने (वय ५९, रा. राजेंद्रनगर) असे या जखमीचे नाव आहे. या प्रकरणी विश्वनाथ उर्फ बिल्ल्या सौदागर कांबळे, शंकर नागटिळे, देवदास अविनाश सकट सर्व (रा. राजेंद्रनगर) या तिघांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात अरुण जगदने यांनी फिर्याद त्यांनी दिली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शंकर नागटिळे आणि देवदास सकट यानी अरुण जगदने यांच्या प्लॉटवर लाकडी बांबू मारुन अतिक्रमण केले. अरुण जगदाने हा राहत असलेल्या घरासमोर विश्वनाथ कांबळे, शंकर नागटिळे, देवदास सकट यानी अरुण जगदाने यांच्या घरासमोर येऊन जगदाने यांना तुम्ही या जागेचे एक लाख रुपये द्यावेत, अन्यथा तुमची जागा मला द्यावी, अशी धमकी देत त्यांना वीटेने मारहाण केली. तसेच अरुण जगदाने यांच्या पत्नी आणि मुलांच्या अंगावर वीटा फेकून मारण्यास सुरुवात केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी अरुण जगदाने यांनी विश्वनाथ कांबळे, देवदास सकट, शंकर नागटिळे या तिघांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.