फटाके उडवण्यावरून एकास मारहाण

0
95

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथे, रस्त्यावर फटाके का उडवतोस? असा जाब विचारत एकाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये केतन राजेश यादव (वय २२, रा. आनंद स्वरुप पार्क, कसबा बावडा) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याने राज मगदूम आणि अनोळखी इसम अशा दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केतन यादव हे आपल्या घरासमोर फटाके उडवत होते. दरम्यान राज मगदूम आणि अन्य एकजण यांनी रस्त्यावर फटाके उडवत आहेस, असा जाब विचारत शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड घालून केतन यादव याला जखमी केले. याप्रकरणी त्याने राज मगदूम आणि त्याच्या साथीदाराविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.