गुळ चोरी प्रकरणी एकाला अटक…

0
189

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहू मार्केट यार्ड परिसरातील पाच व्यापाऱ्यांचे गुळाचे रवे चोरीला गेले होते. याप्रकरणी काही व्यापाऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी आज (सोमवार) संतोष कानजी ठाकूर (वय २९, रा. विक्रमनगर) याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचे गुळाचे ३० रवे  ताब्यात घेतले आहेत.