चंदगड येथे ठेकेदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी एकास अटक

0
98

चंदगड (प्रतिनिधी) : रस्त्याचे काम चालू असताना ‘माझ्या टक्केवारीचे काय झाले? तुम्हाला किती वेळा सांगायचे, असे म्हणून शिवीगाळ करत तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या एकाला आज (मंगळवार) चंदगड पोलिसांनी अटक केली. अनिल जोतिबा तळगुळकर (वय ४२, रा. मांडेदुर्ग ता. चंदगड)  असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

या प्रकऱणी शासकीय ठेकेदार बसवंत लक्ष्मण आडकुरकर (वय ४२)  आणि यांनी अनिल तळगुळकर आणि त्यांच्या तीन अज्ञात साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

चंदगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  आडकुरकर आणि तळगुळकर हे एकमेकांच्या परिचयाचे असून बसवंत अडकुरकर हे ठेकेदार आहेत. आडकुरकर यांनी  पाटणे फाटा ते मोटणवाडी  या रस्त्याचे काम घेतले आहे. त्याठिकाणी अनिल तळगुळकर येऊन आडकुरकर यांना ‘माझ्या टक्केवारीचे काय झाले? तुम्हाला किती वेळा सांगायचे असे म्हणून यांना शिवीगाळ करत तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यावेळी तळगुळकर यांच्या एका साथीदाराने चाकू दाखवून धमकावले. तसेच वेळेवर पैसे दिले नाही तर तालुक्यातील रस्त्याचे काम व्यवस्थित नसल्याबाबत खोटे आंदोलन करू, अशी धमकी दिली.

तसेच पाटणे फाटा माणगाव जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या एका हॉटेलसमोर ‘तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. मला जर थांबवायचे असेल तर तुम्हाला मला पाच लाख रुपये द्यावे लागतील’ असे अनिल तळगुळकर यांनी साथीदारासह वसंत आडकुरकर यांना सांगितले. तक्रारीनंतर  पोलिसांनी अनिल तळगुळकर याला अटक केली. पुढील तपास पोलीस सबइन्स्पेक्टर पवार करत आहेत.