कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथील ओंकार शिवाजी पाटील (वय ३१, रा. आकुर्डे) यांच्या करवीर इन्फ्रा नावाच्या क्रशर साईटच्या ऑफिसमधून रोख एक लाख पन्नास हजार आठशे सत्तर रुपये लंपास केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. प्रकाश मानसिंग लमाणी (वय ३७, रा. हेगडीहाळ, ता. जिल्हा विजापूर, सध्या रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) याला अटक करण्यात आली आहे.

कळे पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद सुर्वे यांनी तपास लमाणीला अटक करून त्याच्याकडून आज दीड लाख रुपये जप्त केले आहेत.