हातकणंगले (प्रतिनिधी) :  हातकणंगले पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर काळ्या बाजाराने देशी बनावटीची दारू विकणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. राजकुमार अशोक घाटकर (रा. हातकणंगले)  अशी अटक केलेल्याचे नांव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्याकडून अंदाजे १५  हजार ६०० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत . ही कारवाई हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक  साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप कांबळे,  कृष्णात माने, रवींद्र जगताप, संग्राम पाटील, सागर पोवार, प्रांजल कांबळे यांनी केली.

हातकणंगले पोलिसांनी कोरोना संचारबंदीमध्ये अवैध धंद्याविरोधात मोहीम तीव्र केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे चोरट्या मार्गाने दारू व गुटखा विक्री कऱणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.