गांजा बाळगल्याप्रकरणी इचलकरंजीतील तरुणाला अटक…

0
67

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील संभाजीनगर चौकात गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीसांनी एकाला अटक केली आहे. चिन्मय अरूण वेलणकर (वय १९, रा. सातपुते गल्ली, हत्ती चौक, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन हजारांचा २५५ ग्रॅम गांजा, ७५ हजारांची मोपेड असा सुमारे ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजीनगर चौकात चिन्मय वेलणकर हा आपल्या मोपेडच्या डिगीतून तीन हजार रुपयांचा २५५ ग्रॅम गांजा घेऊन जात होता. त्यावेळी पोलीसांनी त्याला अडवले असता आणि त्याच्या गाडीची झडती घेतली असता पोलीसांना हा गांजा आढळून आला. याप्रकरणी पो. हे. कॉ. नितीश कुऱ्हाडे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर चिन्मयचा साथीदार तुषार राजू साळुंखे (रा. वेंकटराव हायस्कूल, इचलकरंजी) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.