कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी आज (मंगळवार) करवीर निवासनी श्री अंबाबाईची ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराहीच इंद्राणी चामुंडा सप्तमातरा स्वरुपातील सालंकृत महापूजा साकारण्यात आली. ही पूजा श्रीपूजक सुकृत मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि विद्याधर मुनिश्वर यांनी बांधली.

इंद्राणी मातृका ही देवांचा राजा इंद्र यांची शक्ती आहे. हिला ऐंद्री, महेंद्री किंवा वज्री असेही म्हणतात. ही चतुर्भुज असून हत्तीवर आरुढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र, पाश व कमळ आहेत. विविध दागिन्यांनी सजलेली असून मुद्रा आक्रमक आहे.