ना. नारायण राणे यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शिवसैनिक रस्त्यावर 

0
339

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ मुंबई बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. ना. नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन, रास्ता रोको, महामार्ग रोको अशा आंदोलनातून शिवसैनिक संताप व्यक्त करीत आहेत.

कोल्हापूर शहरात जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवसैनिक ऐतिहासिक बिंदू चौकात ना. नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. युवा सेनेच्या वतीने महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको करण्यात येणार आहे. तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर किणी टोल नाका येथे महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अचानक जिल्ह्यातील शिवसैनिक ना. नारायण राणे यांच्या बद्दल संताप व्यक्त करीत रस्त्यावर आल्याने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.