राज्याभिषेक दिनानिमित्त दिव्यांग सेनेतर्फे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक…

0
129

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात दिव्यांग सेनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रुईकर कॉलनी येथील  छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष नारायण मडके, संपर्क प्रमुख विकी मल्होत्रा, करवीर तालुकाध्यक्ष उत्तम चौगुले, शाहूवाडी तालुकाध्यक्ष तुकाराम हारुगडे,  अतुल धनवडे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.