‘गोकुळ’ परिवारातर्फे डॉ. वर्गीस कुरियन यांना अभिवादन

0
66
????????????????????????????????????

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्वेतक्रांतीचे जनक दिवंगत डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त गोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले. गोकुळ संघाच्या प्रधान कार्यालयामध्ये माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी मुंबई येथे झालेल्‍या २६/११ च्‍या दहशतवादी हल्‍यातील वीरमरण पावलेल्‍या शूरवीरांना तसेच देशाच्या सीमेवर सेवा करत असताना शहीद झालेले जिल्‍ह्यातील शहीद जवान ऋषीकेश जोधळे, संग्राम पाटील यांना आदरांजली वाहण्‍यात आली.

यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील, संचालक विश्‍वास जाधव, पी.डी. धुंदरे, उदय पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक प्रशासन डी.के. पाटील आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.