शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर आज (शुक्रवार) भीक मागो आंदोलन करून शासनाचा निषेध  करण्यात आला. पूरग्रस्तांच्या मागण्याबाबत शासन दिरंगाई करीत असल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनात पूरग्रस्त महिला व पुरुष सहभागी झाले होते.              पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांना शासनाने गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती समिती अध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी दिली.

शिरोळ तालुक्यातील ४३ गावांमधील पूरग्रस्त सामान्य जनतेसह शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक यांच्या विविध मागण्यासाठी शिरोळ येथे तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू  आहे, धरणे आंदोलन तसेच ‘चूल पेटवा, खर्डा भाकरी’ आंदोलन झाले. त्यानंतर आज भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सुरेश सासणे, दगडू माने, भास्कर कुंभार, चांदसाहेब कुरणे, राजापूरचे सरपंच संजय पाटील ,रघुवीर नाईक, विनोद पुजारी, बाळासाहेब माळी, विजय पवार, सुनील इनामदार, शोभा पानदारे, शीला कोळी आदी सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, राजू फल्ले, स्वप्निल श्रीधनकर, सुदर्शन माळी, हर्षद बागवान, दस्तगीर फकीर,  बबलू बागवान यांच्यासह कुंभार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय कुंभार, अमर कुंभार, अनिल कुंभार, ओंकार कुंभार, मनोहर पाटील आदींनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला,