‘स्नेहालय’ संस्थेतर्फे डॉ. माधवी लोकरे यांना मानपत्र…

0
296

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘स्नेहालय’ अहमदनगर संस्थेतर्फे नुकताच कोल्हापूर येथील प्रसिद्ध सौंदर्योपचार आणि त्वचाविकार तज्ञ डॉक्टर माधवी लोकरे यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. ‘स्नेहालय’ ही संस्था पिडीत, शोषित, गरीब, एचआयव्ही बाधित स्त्रिया, माता आणि मुलांसाठी काम करते.

डॉ. माधवी लोकरे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरी यासाठी हे मानपत्र अर्पण करण्यात आले. हे मानपत्र पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोकर्णा, स्नेहालयाचे संस्थापक सदस्य डॉ. गिरीश कुलकर्णी आणि प्राजक्ता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.