शिंगणापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लोकांच्या मृत्यूचे प्रमाण खूप वाढलं आहे. यामुळे पंचगंगा स्मशानभूमी येथे शेणी आणि लाकडाचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी शेणी दान करावेत, असे आवाहन प्रशासनाच्यातर्फे करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत  शिंगणापूर येथील पर्सनल पॉवर तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार शेणी दान स्वरुपात देण्यात आल्या.

यावेळी गणेश चव्हाण, किशोर पाटील, संतोष पाटील, गौरव पाटील, विकास गुरव, रणधीर पाटील, सनी पाटील, निखील चौगुले, अभिजित चौगले, विनायक नरके, सुदर्शन शिंदे, शिवराज साळोखे, प्रथमेश पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.