मुंबई (प्रतिनिधी) :  भारतात ओमायक्रोन व्हेरिएंटचे चार रूग्ण आढळून आले आहेत. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण या व्हायरसचं हे बदललेले स्वरूप अधिकाधिक लोकांना संक्रमित करत आहे. यावर आता आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी, या विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाची आक्रमकता हीच त्याची सर्वात मोठी कमजोरी असल्याचे सांगितले आहे. 

यावेळी आयसीएमआरचे मुख्य एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. समीरन पांडा यांनी,  जो विषाणू जास्तीत जास्त पसरतो तो प्राणघातक असू शकत नाही. यासाठी केवळ पुरावेच नाहीत, तर वैज्ञानिक तथ्यांवरून ही गोष्ट सांगितली जातेय. त्यामुळे लोकांनी या विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाची विनाकारण भीती बाळगण्याची गरज नाही. पण काळजी घेणं खूप गरजेचं असल्याचे सांगितले.