रूई येथील ओंकारचा लाठी-काठीमध्ये नवीन विश्वविक्रम…

0
30

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेला ५ तासांचा लाठी-काठी फिरवणे विश्वविक्रम मोडण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील रूई येथील ओंकार हुपरे याने काल १५ ऑगस्ट दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ असा सलग ८ तास लाठी-काठी फिरवून नवा विश्वविक्रम नोंदवला.

यासाठी ओंकार हुपरे याचा जि.प. सदस्य राहुल आवाडे यांनी त्याचे अभिनंदन करत त्याचा सत्कार केला. ओंकारच्या या कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

यावेळी कबनुर ग्रा.पं. सदस्य सुधीर लिगाडे, अभय काश्मिरे, जमादार,  रुई उपसरपंच युनूस मकानदार, संजय मगदूम, सुभाष चौगुले, दीपक उपाध्ये, अविनाश शिंदे, राजाराम झपाटे, जयसिंग शिंदे, संजय चौगुले आदी उपस्थित होते.