मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (गुरुवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकातील एका ६६ आणि ४६ वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.