जुना राजवाडा पोलिसांनी घरफोडीचा आठवड्यातच लावला छडा : दोन महिलांना अटक…

0
57

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिराजवळ १२ ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीचा छडा आठवड्याभरातच लावण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आज (गुरुवार) सीमा सुरेश पांडागळे (वय ३१) आणि नम्रता संतोष गायकवाड (वय २६, दोघी रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी योगेश गजानन पावसकर (रा. बिनखांबी गणेश मंदिर) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी पावसकर यांच्या घराच्या बाजूच्या पडलेल्या भिंतीच्या बाजूने चोरट्या महिलांनी घरात प्रवेश करून पितळेची भांडी, तांब्याचा बंब असा २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आज सीमा पांडागळे आणि नम्रता गायकवाड या चोरट्या महिलांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.