पदाधिकाऱ्यांनी दूध उत्‍पादकांच्या हिताचा कारभार करावा : महादेवराव महाडिक

0
267
????????????????????????????????????

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळने संस्‍था व दूध उत्‍पादक यांना समोर ठेवून त्‍यांच्‍या हिताचा कारभार केला आहे. प्राथमिक दूध संस्‍था पदाधिकाऱ्यांनी संस्‍थेबरोबर दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज (बुधवार) येथे केले.

पन्‍हाळा व शिरोळ तालुक्‍यातील दूध संस्‍थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालयात महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पन्‍हाळा तालुक्‍यातील श्री. मेढेश्‍वर सहकारी दूध व्‍यावसायिक संस्‍था मर्या, माजगांव, यांच्‍यासह शिरोळ तालुक्‍यातील सहा संस्‍थाना नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी सहा. निबंधक (दुग्‍ध) गजेंद्र देशमुख, रघुनाथ पाटील चिखलीकर, अजित शहापुरे, महेश पाटील, मोहन दिंडे, जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील आदीसह दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.