आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

0
609

बेळगांव (प्रतिनिधी) : बेळगावचे पालकमंत्री व जलसंधारण मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्यावरील आरोप खोटे आहेत. तसेच, आपण नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा देत आहोत, असे त्यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

मंत्री रमेश जारकीहोळी यांचा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी ही व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून  एका तरुणीवर अत्याचार केला. या पीडित तरुणीच्या जीवाला धोका आहे. तिला सुरक्षाव्यवस्था देऊन या  प्रकरणात पीडिताला न्याय मिळवून द्यावा,  अशी मागणी कलहळ्ळी यांनी बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे.  दरम्यान, या प्रकारानंतर जारकीहोली यांनी राजीनामा दिला आहे.