मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी : कंपनीची पायलटवर मोठी कारवाई    

0
77

नवी दिल्ली  (वृतसंस्था)  : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याबद्दल आक्षेपार्ह  टिप्पणी   केल्याने एका पायलटच्या चांगलेच अंगलट आले आहे. या पायलटला विमान कंपनीने निलंबित केले आहे. ‘गो एअर’ विमान कंपनीचे पायलट मिक्की मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. याची दखल घेत कंपनीनी त्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.

अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी कधीही खपवून घेणार नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नोकरीचे नियम, नीतीदर्शक तत्वांचे पालन करावेच लागेल. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा एअरलाईन्सशी कोणताही संबंध नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, माझ्या ट्विट्सचा कंपनीशी कोणताही संबंध नव्हता. ते संपूर्णपणे माझे वैयक्तिक विचार होते. मी या कृतीची जबाबदारी घेतो. त्याचबरोबर या प्रकरणामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची माफी मागतो.   या प्रकरणी कंपनीने केलेली कारवाई मान्य असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच मलिक यांनी मोदींवर टीका करणारे आक्षेपार्ह ट्विट्स काढून टाकून आपले  ट्विटर अकांऊट बंद केले आहे.