नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्रात एक लेख लिहीला आहे. त्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी टीकात्मक टिप्पणी केली आहे. यावरून काँग्रेस समर्थकांनी आक्षेप नोंदवत ओबामांनी माफी मागावी, असे म्हटले आहे.  #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होत आहे.

‘न्यूयॉर्क टाईम्स’ने हा लेख प्रसिध्द केला असून यात राहुल गांधी यांचा उल्लेख गोंधळलेले विद्यार्थी असा केला आहे. राहुल गांधी एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे वाटतात, ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून आपल्या शिक्षकांना प्रभावित करण्यासाठीही तयार आहे. मात्र कुठेतरी त्या विषयामध्ये प्राविण्य मिळवण्याची योग्यता तसेच चमक या विद्यार्थ्यामध्ये दिसत नाही.

दरम्यान, ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात जगभरातील राजकीय नेत्यांविषयी  भाष्य केले आहे. मात्र राहुल गांधी यांच्यासंदर्भातील उल्लेखाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. याचसंदर्भात आक्षेप नोंदवताना नेटकऱ्यांनी ओबामांनी माफी मागावी असेही म्हटले आहे. #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होत आहे.