प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची निर्गत नियोजित वेळेत : कादंबरी बलकवडे (व्हिडिओ)

0
152

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची निर्गत नियोजित वेळेत करणार असून त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिली. सुधारित यादी निवडणूक आयोगाकडे पाठवून त्याचा अहवाल पाठवणार  असून अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची तारीख निवडणूक आयोगाकडून येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रशासक कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, मतदार यादीवर अठराशे हरकती दाखल झाल्या आहेत. त्या सर्व हरकतींची निर्गत करण्यासाठी महापालिकेचे तीन उपायुक्त आणि शहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामुळे सुधारित यादी करण्याचे काम तीन मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची तारीख येणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपायुक्त निखील मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.